शुभ संध्याकाळ, शुभ शनिवार

Started by Atul Kaviraje, November 02, 2024, 07:51:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, शुभ संध्याकाळ, शुभ शनिवार.

शुभ संध्याकाळ !

शुभ संध्याकाळ, प्रकाश आणि छाया
सूर्य घरी जातो, देत धरित्रीस माया
आसमानात रंगांची उधळण थोडीफार,
संध्याकाळच्या कप्प्यात उघडते अंधाराचे दार.

संध्याकाळी वारा, हलका आणि गार
फुलांचा सुवास, भरतो सारा संसार
झाडांची सळसळ, गाणं गातात,
मनात शांतता भरत जातात.

चांदण्यांचे राज्य, आभाळात येते
काळ्या रात्रीत, चमचम चमकते
उगवतो एक नवा तारा, अंधारात,
संध्याकाळची निरव शांतता पहात.

संध्याकाळची ही वेळ, विचारांचे काहूर
मनास लावते अनपेक्षित हुरहूर
संपूर्ण दिवसाची धावपळ, आता थांबत आली,
शुभ संध्याकाळ, नव्याने पुन्हा उगवलीय.

आरामात निवांतता, घेतो एक श्वास
शुभ संध्याकाळ, सुटकेचा सोडतो निश्वास
जीवनाच्या या प्रवासात, हर एक क्षणास जपावे,
संध्याकाळच्या शांततेत, आनंदाने जगावे !

--अतुल परब
--दिनांक-02.11.2024-शनिवार.
===========================================