मनातील सरीता

Started by mrugjal, December 29, 2010, 05:57:22 PM

Previous topic - Next topic

mrugjal

प्रेमाच्या थेंबांनी व्यापलेली,
शिंपल्यांच्या माळेने श्रुंगारलेली,
सुर्याच्या प्रकाशात चमकणारी,
चंद्राच्या चांदणीत भुलवनारी,
शुभ्र पाण्याने वाहणारी,
नितळ मनाने गीत गाणारी.

बेधुंद होऊन ती वाहत असते,
वाऱ्याच्या ओघात ती नाचत असते
असतो तिचा एकच ध्यास,
सागराचा मिळावा तिला सहवास!
वाटेतील अडथळ्यांना येते ती पार  करून,
आणि जाते सागरात स्वतःला हरपुन!

नसते तिला तिच्या अस्तित्त्वाची  काळजी,
सागरात जीव असतो तिचा, त्याची ती प्रेयसी!
असं कधी होईल का माझ्या जीवनात?
तिच्या मनातील सरीता कधी येउन  मिळेल का माझ्या मनाच्या सागरात?
सुर्यास्ताच्या आधी येईल का ती  माझ्या जीवनात?
दोघांचा सुर्यास्त होईल का एका  मनात, या जीवनात?

MTK CHIP

प्रेमाच्या थेंबांनी व्यापलेली,
शिंपल्यांच्या माळेने श्रुंगारलेली,
सुर्याच्या प्रकाशात चमकणारी,
चंद्राच्या चांदणीत भुलवनारी,
शुभ्र पाण्याने वाहणारी,
नितळ मनाने गीत गाणारी.

बेधुंद होऊन ती वाहत असते,
वाऱ्याच्या ओघात ती नाचत असते
असतो तिचा एकच ध्यास,
सागराचा मिळावा तिला सहवास!
वाटेतील अडथळ्यांना येते ती पार  करून,
आणि जाते सागरात स्वतःला हरपुन!

नसते तिला तिच्या अस्तित्त्वाची  काळजी,
सागरात जीव असतो तिचा, त्याची ती प्रेयसी!


Ith Paryant ZAKAAS !!!!!
Pudhe shabd nahi julat ho ! :D