प्रेम हे असंच असतं...!!!

Started by Omkarpb, January 01, 2011, 04:55:13 PM

Previous topic - Next topic

Omkarpb


प्रेम हे असंच असतं,
कधी हसवणारं,
तर कधी रडायला लावणारं !
कधी आतल्या आत गुदगुल्या करणारं,
तर कधी टोचून टोचून घायाळ करणारं !
प्रेम हे असंच असतं.


प्रेम म्हणजे अथांग सागर असतो, आनंदाचा
प्रेम म्हणजे एक थेंबही असतो, डोळ्यांतल्या अश्रूंचा.
प्रेम म्हणजे साठवण हव्याहव्याश्या सुखाची,
प्रेम म्हणजे आठवण काटेरी दुःखाची.


अंगावरून अलगद पीस फिरतो आहे, असं वाटायला लावणारं म्हणजे प्रेम,
आणि क्षणोक्षणी हृदयाचे तुकडे तुकडे करणारंही प्रेम.
प्रेम कधी अडलेला बांध फोडायला लावणारं,
तर कधी वाहत पाणी कायमचं अडवणार.


प्रेम म्हणजे कमजोरी, प्रेम म्हणजे ताकद.
प्रेम म्हणजे दिवाळी, प्रेम म्हणजे आफत.
प्रेम म्हणजे आभाळ भरभरून वाहणारं,
प्रेम म्हणजे आभाळ सारं काही वाहून नेणारं.


तापलेल्या प्रसंगी गारवा देणारी लहानशी वाऱ्याची झुळूक म्हणजे प्रेम.
गारठलेल्या शरीराला झोंबणारा वारा म्हणजेही प्रेम.
प्रेम हि नाण्याची एक बाजू असते,
आणि दुसरी बाजूसुद्धा प्रेमच असते......


प्रेमात पडल्यावर प्रेम करणाऱ्याला
प्रेमासाठी आयुष्य पुरत नाही.
प्रेमात पडल्यावर प्रेम करणाऱ्याला
बलिदान द्यायला प्रेमसुद्धा उरत नाही.


प्रेमामध्ये कुणाचं चुकत असतं? कुणाचं बरोबर असतं?
खरं तर दोघांपैकी जो खरं प्रेम करतो, तोच चुकत असतो,
कारण, जो प्रेम करत नाही, तो प्रेम करण्याच्या योग्यतेचाच नसतो !!
प्रेम हे असंच असतं....
कधी मनापासून हसवणारं,
तर कधी मनातल्या मनात मूकपणे रडवणार.........!!!
प्रेम हे असंच असतं..........




                                                                            - ओंकार प्र. बडवे