किती दिवस झाले

Started by Sachish, January 03, 2011, 07:06:34 PM

Previous topic - Next topic

Sachish

किती दिवस झाले

किती दिवस झाले
कविता लिहिली नाही
किती दिवस स्वतःसाठी
जगलेली मी नाही

किती दिवस झाले
स्वार्थी झाले  नाही
किती दिवस इच्छांना
अंगण  माझ्या नाही

किती दिवस झाले
जखमा भरत नाही
किती दिवस माझ्या
जखमा संपत नाही


किती दिवस कुणी
प्रेम केले नाही
किती दिवस मोकळा
श्वास मला नाही

किती दिवस झाले
रडू शकले नाही
किती दिवस आसवांना
मोकळा रस्ता नाही

किती दिवस झाले
खंदा आधार नाही
किती दिवस प्रेमाकडून
आपलेपणा नाही

किती दिवस मला
माझा विश्वास नाही
किती दिवस झाले
कविता लिहिली नाही


-श्रद्धा दिवेकर माने or Sachish