ओढ....... त्या क्षणाची

Started by amoul, January 08, 2011, 10:29:06 AM

Previous topic - Next topic

amoul

स्वप्नांच्या वाटेवरती पाऊले कुणाची,
बदलली तऱ्हा हर एक मनाची.

इतका मधुर स्पर्श मोरपंख जणु,
नुसत्या आठवणींनी गंधाळते तनु.
असे काही चालणे जसे पाकळ्यांचे सांडणे,
शब्द कसा गोड जसा वेद मुखी मांडणे.
पावलापावलांत  जणु नव बीजांची रोपणे,
कोमलता तुझ्याकडची तू त्यांना सोपणे.
नजरेत हया डोईवर पदर,
म्हणजे चांदण्यानीही  फुलावे निडर.
पण झाकल्या पदरात कुणाचा चेहरा,
दूरच्या रानातून कुठूनसा झरा.
हर एक रात्री हीच जळजळ मनाची.
स्वप्नांच्या वाटेवरती पाऊले कुणाची.

सरता रात्र, होते पहाट,
जरी असले स्वप्न अपुरे तरी सरते पायवाट.
परतीच्या पावली दुराव्याच्या चाहुली,
मागे सोडून जीव पुढे जाणारी सावली.
मग विखुरलेले मोरपंख, चुरगळलेल्या पाकळ्या,
स्वप्नातून खेचून आणती वास्तवाच्या साखळ्या.
पुन्हा अपुरी रात्र पुन्हा अपुरी स्वप्न,
आणि पुन्हा रात्र कवटाळून स्वप्नांसाठी झोपणं.
तरी पुन्हा तेच रोज,
झाकला चेहराच दररोज.
कधी तरी येईल तो वारा,
नेईल उडवून लाज झाकल्या पदरा.
पण किती दिवस पाहू वाट त्या पाहुण्या क्षणांची,
स्वप्नांच्या वाटेवरती पाऊले कुणाची.

.....अमोल