जगबुडी

Started by santoshi.world, January 14, 2011, 02:41:14 PM

Previous topic - Next topic

santoshi.world

जगबुडी

कुठे ढगफुटी तर कुठे रस्ता खचलाय,
ओझोनचा ही थर हळूहळू कमी होत चाललाय.

प्लास्टिक, इ-कचऱ्याने जमीन नासवली,
कुठे पुराचे पाणी सर्वत्र थैमान घाली.

उष्णता वाढली आणि हिमनग वितळू लागले,
ज्वालामुखीनेही अशात डोके वर काढले.

सुनामीने सर्वत्र हाहाकार माजवला,
तेलगळतीने सारा समुद्र बरबाद केला.

सिमेंटच्या जंगलाला प्रदुषणाचा विळखा,
उष्यामुळे जंगलात कुठेतरी वणवा पेटला.

खनिज तेलाच्या विहिरींना अचानक लागलेली आग,
निसर्गाने मानवावर काढलेला एक प्रकारचा हा सारा राग.

पाहून हे सारे एकच खंत वाटते,
निसर्गापुढे मानवाची नेहमीच हार असते.

जगबुडी आता आली आहे जवळ,
पृथ्वीबरोबरच मानवाचा विनाश आहे अटळ.

- संतोषी साळस्कर.

स्वप्नील वायचळ

kadhi???
Ghabarlo na mi....

Anyways...really nice thoughts ....Real issues expressed well...
Very very Nice

Rahul Kumbhar

very nice poem..I liked it... :)

amoul

फार छान कविता आहे !!
पण असे हताश होऊन कसे चालेल...संदीप खरेंची "प्रलय" कविता ठाऊक असेलच...मनाला उभारी भेटेलच.
पण तुमची कविता पण आवडली.