आई

Started by दिगंबर कोटकर, January 17, 2011, 09:01:07 AM

Previous topic - Next topic

दिगंबर कोटकर

आई

पाऊस आईच्या मायेचा, 
छत पित्याच्या प्रेमाचे, 
बंध रेशीम धागा, 
नाते बहिण-भावाचे....     

स्पर्श आईच्या हाताचा, 
हर्ष आकाशी न मावे, 
दर्शन पित्याचे ग होता, 
लक्ष पेटतात दिवे......     

कवेत आईच्या ग शिरता, 
आठवं बालपणा येतो, 
जसा कातळ खडकातून, 
झरा प्रीतीचा वाहतो......     

शब्द दोन ग प्रेमाचे, 
दु:ख वर्षांचे ग हटे, 
सावळी ग माय माझी, 
मज विठायीच वाटे....     

देह करपला तिचा, 
उभा संसार थाटता, 
हर्ष मावेना आकाशी, 
माझ्या आईला भेटता....     

भय दूर-दूर पळे, 
कवच आईच्या मायेचे, 
देवाहुनी पुण्य आई, 
आहे चरण आईचे........     


स्वर्ग चरणाशी तिच्या,
तिच्या ठायी गंगा-काशी, 
साऱ्या जगतीचे तीर्थ, 
आहे आईच्या चरणाशी.....               

दिगंबर 

दिगंबर कोटकर

आई  हा  शब्दच  किती  मोठा  व  महान  आहे  हे  शब्दात  सांगणे  कठीणच  आहे.