ते निसटलेले क्षण...

Started by vijay_dilwale, January 21, 2011, 08:05:20 PM

Previous topic - Next topic

vijay_dilwale

का कोण जाणे...चुकल्या चुकल्यासारखा वाटतंय...
सगळं काही जागेवर असून...काहीतरी हरवल्यासारखा वाटतंय....

मोठा तर झालोय खूप...अगदी आकाशात उडेल एवढा...
भरारी हि घेतलीये...स्वप्नांच्या दिशेने..
तरी पण परत एकदा आई च्या कुशीत शिरावसा वाटतंय...
तिच्या हाताने मऊ मऊ साखर भात खावासा वाटतोय...
तिच्या डोळ्यात आलेले ते दोन थेंब माझ्या चिमुकल्या बोटांनी पुसावस वाटतंय..


जग आता छोटं वाटतंय...
हिंडायला मोकळं रान हि कमी पडतंय...
तरी पण परत एकदा बाबांचं बोट धरून चालावसं वाटतंय...
माझेच बाबा सगळ्यात चांगले असं म्हणून या दुनियेशी भांडाव वाटतंय...
त्यांनी मला उठून उभा कराव...म्हणून परत एकदा पडावं वाटतंय...


व्यवहार तर शिकलोय आता..
बेरीज - वजाबाकी , घेणं - देणं सगळं कसं अचूक जमतंय..
तरी पण परत एकदा....तितक्याच निरागसतेने भावाशी भांडावासा   वाटतंय...
परत एकदा तोच खेळ मांडून हसावंसं वाटतंय..
आधी तर नेहमीच जिंकायचो मी..पण आता मात्र हरावसा वाटतंय...


कळत नवतं तेव्हा काहीच...
आता कळत असून पण वळत नाहीये..
इच्छा तर खूप आहे मनात...
पण ते निसटलेले क्षण..
परत कधीच मिळणार नाहीयेत..

- विजय दिलवाले

दिगंबर कोटकर

खुप छान कविता आहे .................
मन अगदी भुत्कालात जाउन आल...........

amoul

khari vyath aahe mitra !!! lahanpan nistun gela tasycha changly goshtihi nistunach gelya yar

rups

ho...kharach ..."Gele te diwas..Uryla tya Athawni"...Khup chan lihila ahes..

vijay_dilwale

dhanyavad mitrano..!
tumche ase abhipray vachun kharach khup samadhan watla!

rudra