शापित प्रीती.....

Started by दिगंबर कोटकर, January 31, 2011, 10:06:00 AM

Previous topic - Next topic

दिगंबर कोटकर


 
निळ्याशार रत्नाकर,

अन त्या फेनिल लाटा,

सागराचा तो मनोहर,

अन नयनरम्य किनारा,

आनंदापारी माझ्या,

वेदनाच होती मना,

मनाचे समाधान,

हरवले आठवणींत तुझ्या,

यातनांनी केले वास्तव,

मनामध्ये माझ्या.........
 

झाली असेल चूक,


कळत-नकळत,

त्याचा परिणाम ग,

इतका झाला भयंकर,

सुखाचा किनारा,

शोधिते माझी नाव,

निवाऱ्यासाठी हक्काचे,

मिळावे एखादे गाव....



माझ्या नशिबी नव्हते,

सुख अन समाधान,

भाळी लिहिलंय ग माझ्या,

दु:ख करणे सहन,

मृत्यूचे हि भय मला,

आता सतावत नाही ,

यमाच्या दुतालाही,

मी आता घाबरत नाही.........



यमदूत एकदा माझ्यासमोर,

प्रगट ग झाला,

मला म्हणे, सांग तुझी,

शेवटची इच्छा मला.....



याम्दुताला पाहून,

हास्य आले माझ्या ओठी,

माझ्या चेहऱ्यावर हास्य पाहून,

त्याच्या कापली आली आठी....



माझी शेवटची इच्छा, प्रिये,

मी जाहीर ग केली,

तुझ्याच दर्शनाची मी,

त्याच्याकडे मागणी ग केली,

ऐकून मागणी माझी,

हसू आले त्याला,

दारात मृत्यू उभा असूनही,

म्हणे,भेटायचेय प्रियेला......



उपहास करू नकोस,

मूर्ख , यमदुता,

प्रेमापुढे टेकवती,

देवी-देवताही माथा...



रामासंगे वनवासी,

झाले हाल सीतेचे,

तरीही डगमगले नाही,

मन त्या जानकीचे,

सावित्री अन सत्यवान,

अमर आहे प्रेम त्यांचे,

लक्षुमणाच्या विरहाने,

डोळे पाणावती उर्मिलेचे,

कामदेवाच्या दुराव्याने,

घायाळही रती ...........



मग तूच सांग, यमदुता,

का रे ? शापित ही प्रीती,

का रे ? शापित ही प्रीती.....



सलाम माझा, त्या प्रेमवीरांना,

जे फक्त आठवणीवरच तळमळतात,

का? कसे? कुणास ठाऊक,

ते असे शापित जीवन जगतात......



दिगंबर......

vivekphutane

Khara pream shapit ka asta ajun paryant kunalach kalale nahi
Tarihi pream karanaraynchi sankhya kami honar nahi.

Lucky Sir

सलाम माझा, त्या प्रेमवीरांना,

जे फक्त आठवणीवरच तळमळतात,

का? कसे? कुणास ठाऊक,

ते असे शापित जीवन जगतात......

AMHI PAN JAGAT AHOT!!!!!!!!!

vivekphutane

Nusatach jagu naka,tar shap sudha
mage hatel ashi jigar thewa............

vebsi


santoshi.world

chhan ahe kavita
सलाम माझा, त्या प्रेमवीरांना,
जे फक्त आठवणीवरच तळमळतात,
का? कसे? कुणास ठाऊक,
ते असे शापित जीवन जगतात.


PINKY BOBADE

kavita kup chan lihali aahes mitra, :) thanx