बी माय व्हॅलेण्टाइन, कारण....

Started by MK ADMIN, February 13, 2011, 11:09:19 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

हॅलो फ्रेण्ड्स , ज्या दिवसाची आपण सगळेजण वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहात होतो, तो गुलाबी दिवस आता अगदी जवळ आलाय. येस्स, गुलाबी बोले तो व्हॅलेन्टाइन्स डे!

तुमच्या मनातला काही संदेश किंवा चारोळी...कविता असं काहीही अगदी थोडक्यात आणि कल्पकतेने लिहा आणि तो आम्हाला पाठवा. अट एकच, फॉर्वडेर्ड मेसेज इथे नकोत. त्या भावना तुमच्या हव्यात.

Omkarpb


होकाराच्या प्रतीक्षेत असलेला वीर आता बोलूनच टाकू म्हणून तयार असतो,
रोपट्यावरून खुडलेला गुलाब कुण्याच्या आठवणीत तर कुणाच्या कचऱ्याच्या पेटीत जातो,
आठवणींचं वगैरे ठीक आहे, पेटीत गेला, तर एक सांगतो,
१४ तारखेचा हा दिवस प्रत्येक वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये असतो.......................!


--Omkar P Badve

प्रशांत पवार

येशील येशील म्हणताना,
वेलेन्ताइन जवळ आला,
तुझी वाट पाहून,
तो गुलाब हि सुकून गेला..


सागर कोकणे

मनातल्या मनात तू ही कित्येक स्वप्ने रंगवत असशील
माझ्याच विचारात या स्वप्नांच्या जगात हरवत असशील
माझ्या सहवासाचे क्षण आठवून रात्र-रात्र जागत ही असशील
'माझेही तुझ्यावर प्रेम आहे रे कळत का नाही तुला ?'
असेच म्हणत असशील ना...माझ्या विरहात तू ही जळत असशील ना...

-काव्य सागर

kunalraje

का कुणास ठाउक पण आता तू रोज स्वप्नात येतेस,पहाटे जाताना मात्र अस्वस्थ करून जातेस..
आता झोपी जाताना पुन्हा मनाला बजावल, तुला नहीं आठवायच,प्रश्नार्थक नजरेने त्यान विचारल मग कशाला झोपायच :-) :-)
- unknown

प्रशांत पवार

प्रेम... एक छान संवेदना....
त्यात तुझ्या नि माझी गुंतल्या भावना,
प्रेम... वाळक्या लाकडाला फुटलेली नवी पालवी..
माझी प्रत्येक रात्र तुझ्या आठवणीत जावी...
प्रेम... निर्जल झऱ्याला आलेली पाणवल..
तुझ्या माझी प्रेमाचे फुललेले प्रेम फुल..
प्रेम... ओसाड जमिनीवर आलेली एक हिरवळ ...
तुझ्या माझ्या प्रेमाची अशीच फुलत राहो कातरवेळ..

♫♥♫प्रशांत पवार♫♥♫

kavivm

माज़ी  ही कविता
कविता नसती
जर तिला शब्द मिळाले नसते
मज जगण्याला अर्थ नसता
जन तू जीवनात आली नसती
माज्या भावनाना ही  अंकुर फुटला नसता
जन तु इतकी मनमोहक नसती

तुज साठी
विनु

kavivm

त्या दिवशी तुज्या डोळ्यात मी प्रेम पहिलय
आणि माज्या ह्रुध्याचे ठोके वाढताना जनावालय
आता समजला माला की
मी तुला प्रेम करयाला
             आणि
तू माला जगायला शिकवालय

विनु