"ब्लँकेटखाली झोपलेली मांजर"

Started by Atul Kaviraje, January 01, 2025, 12:27:06 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

शुभ रात्र,  शुभ मंगळवार.

"ब्लँकेटखाली झोपलेली मांजर"

ब्लँकेटखाली मांजर शांत झोपले
मधुर स्वप्नांत ते गुंग होत गेले
त्याचे पाऊल मऊ नरम जणू,
मध्येच ते लागले मांजर-भाषेत गुणगुणू. 😴🐱

चालताना पाय चुकून तिला लागले
हालचाल करून ते फिस्कारू लागले
तिच्या जोरदार श्वासाने ब्लँकेट हलू लागले,
ब्लँकेटचे धागे विस्कळू लागले.   🌙💤

झोपेत ती म्यॅव करू लागली
मधेच पंजाने ब्लॅंकेट बोचकारु लागली
ब्लॅंकेटमध्ये तिला उब जाणवू लागली,
शांतपणे ती डोळे मिटून पडली. 🌧�🛏�

मांजर वागू लागलीय आता माणसासारखी
माणसाची सवय आता  तिला लागली
ब्लॅंकेटमध्ये नुसती ती गुपचूप होती,
त्या उबेत ती खुशाल झोपली होती. 🐾🌞

झोप मांजराची गाढ कधीच नसते
खुट्ट आवाजाने ती कधीची उडते
पण ब्लँकेट खालची शांतता तिला आवडते,
तिला माणसांची ओढ लागलेली असते. ✨💖

     ही कविता ब्लँकेटखाली झोपलेल्या मांजराच्या शांततेचे आणि गोड स्वप्नांचे चित्रण करते. मांजराच्या झोपेत शांतता, सुख आणि सुरक्षिततेची भावना आहे. ब्लँकेट तिच्यासाठी सुरक्षा आणि गोड स्वप्नांचे प्रतीक आहे, आणि ती झोपताना एक गोड शांतीची भावना संपूर्ण वातावरणात पसरते.

चित्रे, चिन्हे आणि इमोजी:
🐱😴🌙💤🐾🛏�🌧�✨💖

--अतुल परब
--दिनांक-31.12.2024-मंगळवार.
===========================================