"शांत बीचवर चमकते तारे"

Started by Atul Kaviraje, January 09, 2025, 12:37:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

शुभ रात्र,  शुभ बुधवार.

"शांत बीचवर चमकते तारे"

शांत बीचवर वाऱ्याची थंड्गार झूळुक
ताऱ्यांच्या झगझगाटाची बीचवर रोशनी  🌊✨
चंद्राला साक्षी राहून, समुद्राच्या  कुशीत येऊन,
तारे आकाशात चमकतात, पृथ्वीवर किरणे पसरवून.  🌙🌟

ताऱ्यांमधून प्रकटणारा अलौकिक साज 
समुद्राच्या लाटांची गूढ गाज
ताऱ्यांची सागराला भेटण्याची अजब रीत,
बीचवर वाजतंय जणू एक गोड संगीत.  🎶💫

     बीचवरील शांतता आणि आकाशातील ताऱ्यांचं सौंदर्य दिलासा आणि शांततेचा मार्ग दाखवितात.

--अतुल परब
--दिनांक-08.01.2025-बुधवार.
===========================================