'प्रक्टिकल लव'

Started by Jai dait, March 08, 2011, 05:39:58 PM

Previous topic - Next topic

Jai dait

प्रेम वेलीसारखं असतं,
आधार मिळाला की फुलत राहतं
पण ते बांडगुळासारखं असलं की
मधल्यामध्ये झुलत राहतं

तिला रडण्यासाठी खांदा हवा होता
त्यालासुद्धा हा अनुभव नवा होता

नुकत्याच झालेल्या प्रेमभंगातून
ती बाहेर येत होती
नकळतपणे त्याला हात धरण्याची
संधीच त्याला देत होती

थांबवायला तिच्या आसवांचा पूर
नेण्यास तिला दुखा:पासून दूर
धीर तिला द्यायला सरसावला तो,
नि हळव्या मनात त्याच्या फुलला प्रेमांकुर
कदाचित नियतीला नव्हतं ते मंजूर...

त्याचं प्रेम तिच्यासाठी होती सहानुभूती
प्रेमात फसण्याची पुन्हा तिला होती भीती
पण तो नव्हता ना इतर सर्वांसारखा
त्याच्या मनात होती फक्त आपुलकीची प्रीती

तिच्यासाठी तो होता फक्त चांगला मित्र
त्याला कसा बनवायचा आयुष्याचा जोडीदार?
आयुष्याचं असंच  थोडी रंगतं चित्र, आणि
नुसतंच प्रेम असून थोडीच भागतं यार...

आता ताकही फुंकून प्यायची वेळ होती...
खरं प्रेम,, शेवटचं कुणी केलं ते आठव
आजकाल असं काही होत नसतं रे
आता फक्त असतं 'प्रक्टिकल लव'

तुझ्या संगे सुख-दुख: वाटीन मी
पण त्यात आहे एक छोटासा झोल,
चंद्र ता-यांच्या गप्पात मला नाही रस
तू घर कधी घेणार ते आधी बोल

त्यानेही मग समजावले मनाला
हा तर आहे काही भलताच गेम
कळतच नाही, प्रेमातला व्यवहार 
की हे व्यवहारातलं प्रेम...

-जय

rudra

v.v.nice i like it.......attache prem bahutek asech asave but both r true....
thanx....again... pan tyachi paristhiti ghar ghenyachi nasel tar tyala prem karnyacha adhikar nahi ka ?................................ 8)

santoshi.world

apratim kavita ........ mala khup khup khup avadali .......... mala konachi tari athvan ali kavita vachatana ...... maza to pan etar sarvan sarkha nahi so hya lines vishesh avadalya mala ......... thanks :)

थांबवायला तिच्या आसवांचा पूर
नेण्यास तिला दुखा:पासून दूर
धीर तिला द्यायला सरसावला तो,
नि हळव्या मनात त्याच्या फुलला प्रेमांकुर
त्याचं प्रेम तिच्यासाठी होती सहानुभूती
प्रेमात फसण्याची पुन्हा तिला होती भीती
पण तो नव्हता ना इतर सर्वांसारखा
त्याच्या मनात होती फक्त आपुलकीची प्रीती

hya lines pan khup avadlya ...... its very true
प्रेम वेलीसारखं असतं,
आधार मिळाला की फुलत राहतं
पण ते बांडगुळासारखं असलं की
मधल्यामध्ये झुलत राहतं

Jai dait

मलासुद्धा ही कविता खुप जवळची आहे..

kk11star

niceeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee..................!!!!!!!!!!!!!!

हर्षद कुंभार


taa

hey rudra.. mala nahi watath ha adhikar ahe konala, konacha jiwashi khelaicha... Karan pahile prem kara aani nantar tilach dukhwa, haa kuthla nyay ahe >:(

Jai dait

या कवितेतील सर्व घटना आणि पात्र वास्तव आहेत, तथापि त्यांचा कल्पनेशी काही संबंध नाही.