मनीमाऊ

Started by बाळासाहेब तानवडे, March 12, 2011, 03:58:44 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे


मनीमाऊ
मनीमाऊ-मनीमाऊ,
तुझं अंग किती गं मउ.
पायात सारखी घुटमळते,
करते माऊ माऊ.

भाचा तुझा वाघोबा,
मावशी तु त्याची.
पण केवढा मोठा तो,
मात्र तु छोटी कशी?

खेळायला कोणी नाही,
म्हणून चुपचाप बसतेस.
उंदीर भाऊ आला तर मग,
त्याला पळवून का लावतेस?

शेजारचा मन्या बोका,
तुझा नवरोबाच ना गं?
कधी तरी प्रेमान वाग ना,
सदा भांडणच का गं?

मनीमाऊ मनीमाऊ,
तुझं आपलं बरं बाई.
नुसतंच हुंदडायचं पण,
अभ्यासाचं मात्र नाव ही नाही.

कवी :  बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब  तानवडे – १२/०३/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/
प्रतिक्रीया अपेक्षित
 

gaurig