तुझ्या माझ्या मैत्रीमध्ये......

Started by sachin tale, March 16, 2011, 10:37:20 AM

Previous topic - Next topic

sachin tale

स्वराच्या या स्वरामध्ये स्वर आपले जुळले
तुझ्या माझ्या मैत्रीमध्ये एक फुल असे फुलले
क्षणाच्या या क्षणामध्ये क्षण असे उमटले
कि तुझ्या माझ्या मैत्रीमध्ये अनेक काटे फुटले

मनाच्या या मनामध्ये मन आसे गुंतले
मलाच नाही कळाल कि तुझ मन का रुसले
तालाच्या या तालामध्ये ताल आसे पडले
कि तुझ्या माझ्या मैत्रीमध्ये अनेक घुंगरू तुटले

शब्दाच्या या शब्दामध्ये शब्द आसे बोलले
तुझ्या या शब्दाची आठवण माझ्या मनात रुजले
डोळ्याच्या या डोळ्यामध्ये तुझे डोळे काही तरी म्हणाले
कि तुझ्या माझ्या मैत्रीमध्ये आनेकाचे डोळे फिरले

वाऱ्याच्या या भोवऱ्या-भोवती वादळवाट आले
तुला माझ्या पासून दूर अलगत घेऊन गेले
आदर्शहून सुंदर ठरेल आशी आपली मैत्री
कि तुझ्या माझ्या मैत्रीमध्ये आनेकाची मन खाली पडती

इतिहासावरून  ईतिहास हेच सांगत आले
मैत्री मध्ये मित्रा सर्व काही माफ आस्ते
भूगोलाच्या अभ्यासात जरी गोल असला
तरी तुझ्या माझ्या मैत्रीने एक नवा इतिहास रचला .... सचिन तळे