एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

Started by sharad12395, March 22, 2011, 11:23:12 AM

Previous topic - Next topic

sharad12395

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुनी कधी काही बोललेच नाही.....
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

जाण्या-येण्याच्या वेळाही एक,
ठरुनच गेल्या होत्या बहुतेक
वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नसेना का घडले मिलन परि...
आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी
नियतीचे कोडे कळ्लेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

राहिले जरी हे प्रेम अव्यक्त
मनी न उरली बोच हि फक्त
जगणे.....वाटणार ओझे नाही
ज़रि....... हे अबोल प्रेम फुललेच नाही !!