"क्षणिक आयुष्यावर थोड़ बोलू...."(चारुदत्त अघोर.२६/३/११)

Started by charudutta_090, March 27, 2011, 04:45:28 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं,
"क्षणिक आयुष्यावर थोड़  बोलू...."(चारुदत्त अघोर.२६/३/११)
काही उरल्या खप्लित,जखमा आज सोलू,
उघड्या जिवघरास,चपरू थोड़े प्रेम कवेलू,
कधीचे कुलपित मन-दरवाजे आज खोलू,
चला क्षणिक आयुष्यावर,आज थोड्यावेळ बोलू.

न संपणार्या जीवन रस्ती थोड़ शतपाउलि चालू,
मनमानी करणार्या मनास,जरा आवर घालू;
बेताल सवयी सावरून थोड़,लयबद्ध तालू,
चला क्षणिक आयुष्यावर,आज थोड्यावेळ बोलू.

स्तब्ध वृक्षित जीवन फांदी संगे थोड़ वारी हलू, 
मनोवृत्तिस बहरवुन, जरा पुष्परुपी खुलू;
वड़ रूपी आयुष्याच्या, पारंबीत पाळणी झुलू,
चला क्षणिक आयुष्यावर,आज थोड्यावेळ बोलू.

अनुभवी वयस्कांच्या, उपदेश संगीति डोलू,
जीवन चक्रा भोवती जरा गोलाकारित गोलू;
मर्यादित जीवनाच्या, कुम्पणी थोड़ रेलू;
चला क्षणिक आयुष्यावर,आज थोड्यावेळ बोलू.

अन्ताक्षरित शब्दी, पुढली जीवन सुरुवात झेलू,
अन्धकारित येत्या क्षणास,बेसवधि पाउलू;
थोड्या फसव्या आशेनं,येत्या ध्वनिस चाहुलू,
चला क्षणिक आयुष्यावर,आज थोड्यावेळ बोलू.

भुत व् भविष्याच्या,वर्त्तमान काटी स्वतःस तोलु,
लिलाव रुपी आयुष्याला,योग्य दामी मोलू;
उर्वरित आयुष्याला,न्यायित निर्णयी पेलू,
चला क्षणिक आयुष्यावर,आज थोड्यावेळ बोलू.
(चारुदत्त अघोर.२६/३/११)