ऊन एकदा रूसलं

Started by sagarB, March 27, 2011, 09:13:17 PM

Previous topic - Next topic

sagarB

ऊन एकदा रूसलं,
गुदगुल्या केल्या किती, तरी नाही हसलं..
मग हळुच बाजूला घेऊन कारण मी पुसलं..
तर म्हणे त्या पावसचं अन माझं बिनसलं..

कवींना कळवळा नेहमी पावसचा,
शेतकर्यांना नेहमी पाऊसच वाटतो नवसाचा..
माझ्याकडं कोणी लक्ष देईना ईवलसं..
म्हणून पावसाचं अन माझं बिनसलं...

पावसातच येते सगळ्यांना तीची आठवण..
पावसातच उलगडते गोड आठवणींची साठवण..
ऊन येता थोडसं, तुमचं प्रेम लगेच त्रासलं..
म्हणून पावसाचं अन माझं बिनसलं...

पावसाची वाट बघणारा असतो कोणी चातक..
तो नाही आला तर लोक नशीबाला लावतात पातक..
दूष्टपणासाठी त्याच्या तोंडावर कोणीच नाही काळं फ़ासलं..
म्हणून पावसाचं अन माझं बिनसलं...

(मी मोठ्यांदा हासलो खी-खी करून,
तसा तो म्हणाला मझ्याकडं बघून,
तुला हसायला काय जातयं..ज्याचं जळतंय त्यालाच कळतयं)

मी म्हाणालो,
तुझ्या "जळ्ण्यामुळेच" देवाला सृष्टी घावली..
तुझ्यामुळेच तर पडते झाडाखाली सावली..
स्वतःचं महत्व तुला कधीच नाही गवसलं..
म्हणून तर तुझं अन पावसाचं बिनसलं...

तुझ्यावीना लकाकेल कशी गोरी तीची कांती..
कूडकूडनारी पहाट बिचारी जाईल कुठे अंती??
तुझं मात्र आहे तुझ्या सूजाणतेशीच धुमसलं..
म्हणून तर तुझं अन पावसाचं बिनसलं...

आरे ऊन्हावीना नाही येणार पावसाला कधी "सर"..
ऊन-पावसाच्या खेळानेच तर मंतरलं आहे चराचर..
तुझ्या चटक्यां शिवाय पावसात कोण दंगलं असतं..
दुसर्याच्या समाधानासाठी कधीतरी वाईट होणं चांगलं असतं..

ऐकता ऐकता अचानक ऊन ऊठलं,
कटाक्ष टाकून मझ्याकडं, खूदकन हासलं..
उड्या मारीत, शीळ घालीत वार्याच्या कुशीत बसलं..
आणि मला आपसूक सर्व काही उमजलं..

--- सागर


sulabhasabnis@gmail.com