"ग्रीष्म-शिरीष" ( चारुदत्त अघोर...५/४/११)

Started by charudutta_090, April 07, 2011, 08:41:53 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"ग्रीष्म-शिरीष"     ( चारुदत्त अघोर...५/४/११)             
सहज त्या दिवशी पहाटे मी, अंगणात फेर्या मारत होतो,
या उन्हाळी दिवसात थोडं,तापल्या जीवास थंडावत होतो;
एक उंचावलं झाड थोडी सावली देईल,असं वाटत होतं,
पण,त्यांची पानगळ झाल्या मुळे,ते हि सांगडी राहून उभं होतं;
साडवल्या अंगणी,ताज्या मातीचा वास,नस नस खुलवत होता,
थोड्या हवेच्या झुळुकी सोबत,थकल्या जीवाला उठवत होता;
काहीच वेळात सूर्याची उत्साही प्रखर किरणं,घरावर चढली,
जणू थंडाव्याची पांघरली चादरच,त्यांनी ओढून काढली;
एक स्वप्नयीत चढलेली धुंद,क्षणात हरपली,
माझ्या चालत्या पाऊली, सुकी झडली पानं करपली;
थोड्या मिळालेल्या थंडाव्यानं,मन जरा दवलं,
जसं पूजे अंती,मागणीस दैवच पावलं;
मिळाल्या सावलीत,मी आराम खुर्चीत बसलो,
एक दीर्घ श्वास सोडत,मनाशीच हसलो;
सहज वर बघितलं तर,शिरीषाचं झाड काही फांदी बहरलं होतं,
जणू,नवजात फुलांना,जन्मून आनंदी कहरलं होतं;
सहजच थोड्या प्रसन्न चित्ती,माझा डोळा लागला,
जरा कण भर तृप्त मनी,जीव माझा भागला;
एक गुदगुदल्या स्पर्शानं,मन सुगंधानं विसावलं,
उघडल्या डोळी,दिसलं,एक नाजूक शिरीष फुल गळून छाती पिसावलं;
तरुण्यीत ओघाने,माझ्याशी ते पुढावून वेडावलं,
प्रेयसी रुपी जसं छाती टेकून,लाडावलं;
हळुवार हाथी त्याला बोटावलं,जसं एक नातच त्यानं थाटलं,
या शिरीषाच्या सुगंधी,कोरड्या ग्रीश्मीही दव्ल्या सारखं वाटलं....!
चारुदत्त अघोर.(५/४/११)