अशीच एक कातरवेळ असेल

Started by रामचंद्र म. पाटील, April 09, 2011, 03:55:49 PM

Previous topic - Next topic
अशीच एक कातरवेळ असेल
माझी प्रीत माझ्या जवळ असेल
माझ्यासाठी ती एक नवलाई असेल
तिच्यासाठीही ती एक खुललेली बाग असेल

तिच्या नजरेत जणू चंद्र त्या कातरवेळेचा साक्षीदार असेल,
माझ्यासाठी तोच चंद्र माझ्या प्रेमाचा पुरावा असेल,
गर्दीतही मला तो  हरवल्यासारखा एक भास असेल,
मिठीत तिला घ्यावा अशी एक वेडी आस असेल

तिच्या बोलण्यात फक्त माझीच ओढ असेल
बोलण्यात तिच्या शब्दांची विसंगती असेल,
कदाचित तिला खर्या प्रेमाची जाणीव नसेल
पण माझ्या मनात मात्र एक आनंदाचं वादळ असेल,

वाटेतला एकांत संपणाऱ्या वेळेची जाणीव असेल,
असंख्य आठवणीत डोळ्यात किंचित ओलावा असेल,
निघताना दोघांच्या मनात एकाच हुरहूर असेल,
पुन्हा तीच कातरवेळ अन माझी प्रीत माझ्या जवळ असेल.
  ----------------------------रामचंद्र  पाटील--------------------