“गाभूळलली शाख” ©चारुदत्त अघोर….(१५/४/११)

Started by charudutta_090, April 20, 2011, 12:05:37 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"गाभूळलली शाख" ©चारुदत्त अघोर....(१५/४/११)
किती मोहरलेले ते दिवस...
या दगडी भिंतीच्या कडी,तू लपून दिलेली हाक,
तू अर्ध लपलेली,थोडा दृष्टिस पडलेला तुझा वाक;
नाही विसरलो तुझं, मी न दिसता होणं आवक,
कुठेतरी तू न दिसल्याने,उरात एक आतुरतेचा धाक;
तू आसनावलेला तो,आंब्या खालचा लाकडी बाक,
कसा विसरेन,मी हिसकलेली,तुझी चोखली गाभूळलली शाख;
कारण...
अझुनही,ती आंबट गोड चव,माझ्या तोंडी आहे,
तूच कशी विसरलीस,हीच खरं जीवाची कोंडी आहे;
आज आंब्याच्या झाडावरून एक शाख पडली,म्हणून सगळं आठवलं,
त्या रेशमी दिवसांचं चल चित्र फिरलं,जे नकळत होतं साठवलं;
अशीच मखमली दिवसांची तू पण वाटतं, काही आठवण राखावी,
वाटतं पुन्हा हि गाभूळलली शाख,तू उष्टावून, मी चाखावी....!!!
चारुदत्त अघोर.(१५/४/११)