पाऊस...

Started by chopde.tushar, May 02, 2011, 03:47:59 PM

Previous topic - Next topic

chopde.tushar




            पाऊस...


मला पाऊसात भीजायला आवडेल
तुझी साथ आसेल तर...
चीम्ब होऊन भिजताना हातात
तुझा हात असेल तर ......


तुझ बरसण मला अनुभवायच
मी मला विसरे पर्यत...
स्वताला बेधुन्द करुन घ्यायचय
माझा तोल घसरे पर्यत.....


मातीचा गन्ध रुजलेला असेल
ऐव्हाना तुझ्या माझ्या मनात...
प्रेमाचा प्रत्येक बन्ध भिजलेला असेल
आशा ओल्या-चीम्ब क्षणात......


तो प्रत्येक क्षण मला
जसाच्या तसा अनुभवायचाय...
प्रेमात भिजलेला पाऊस
मला परत एकदा पहायचाय......


नीट बघ आता तु
तु तुझी राहिलेली नसशील...
ओलीचीम्ब असुनही
तु प्रेमात परत एकदा भिजशील......


कुठून तर हळुच मग
वा-याची गार झुळुक येईल...
तुझ्या-माझ्या पावसात भिजण्याची
आठवण करुन देईल......


आता सभोवताली बघ
सगळ शान्त झालेल असेल...
तुला मला भिजवणारा तो वेडा
पाऊसही नसेल......


स्वताला सावरण्याचा प्रयत्न कर
आता आपण सत्यात आलोय...
फुलातुन पाकळी गळते
अगदी तसे वेगळे झालोय......


उरल्या फक्त त्या ओल्या वाटा
ज्यावर आपण चालायचो...
प्रेम म्हणजे काय यावर
तास अन तास बोलायचो......


तु भिजत असताना डोळ्यातुन वाहिलेले मी
ते प्रत्येक स्वप्न टिपल होत...
प्रेमाची मोजमाप सोडुन त्यात तेव्हा
ख्रर प्रेम लपल होत......


आठव कधीतरी माझ्यासाठी
तुझ्याही पापण्या भिजायच्या...
माझ्या सर्व आठवणी मग
तुझ्या कुशीत येऊन निजायच्या......




आता पाऊस पडला की फक्त
तुझी आठवण येते...
तुझ्यात आता तु नाहीस
याची आठवण करुन देते......


आता पाऊसही नावाला उरलाय
ज्यात तुझी साथ नाही...
मी भिजायला तयार आहे
पण हातात तुझा हात नाही...... तुषार सी..........The Gypsy



--



mahesh4812

kiti chan ahe kavita....