"विचारमग्न तू " चारुदत्त अघोर.

Started by charudutta_090, May 04, 2011, 12:01:37 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"विचारमग्न तू " चारुदत्त अघोर.(२५/४/११)
किती ग स्वतःचीच,होऊन राहतेस,
आपल्याच विचार धारेत,कायम वाहतेस,
जसा कोणाशीच नाही, काही घेणं,
राहिलं खूपच दूर,काही देणं,
थोडी तर सावध होऊन,डोळे उघड,
नसली तुला तरी,मला हवी तुझी पकड,
कारण मी एकटा,कधीच नाही राहू शकत,
विचारांच्या उदास रेषा,मी नाही आखू शकत;
मला जगण्यात चैतन्य हवं,न कि हरवणं,
एक सुंदर झोप हवी,न कि फक्त पसरणं;
काय गं मिळतं हे,विचार करून तुला,
खरंच,कधीच समजलं नाही मला;
कसं आयुष्य जगतेस,इतकं कोरडं,ओलाव्या रहित,
तुझ्या गहन विचारात,चुकून माझं अस्तित्व असावं,हेच धरतो गृहीत.;
या फक्त एका माझ्या विचाराने, होतं मन शांत,
तुझ्या हजार विचारांन पुढे,या एकाच विचाराची असेल भ्रांत;
जरी असली तरी हर क्षणी,ती मला सुखावते,
पण तुझ्या चेहेर्याची गहनता,मनी खरंच दुखावते;
एकदा तर तुझ्या मनाची शिवण,कधी मला उसवू दे,
त्या विचारमग्न अंतःकरणी,एकदा तर कधी विसावू दे....!
चारुदत्त अघोर.(२५/४/११)