बंध मैत्रीचे.....................?

Started by manoj vaichale, May 04, 2011, 09:00:35 PM

Previous topic - Next topic

manoj vaichale

बंध मैत्रीचे
खरच नको देवुयत
नाव आपल्या मैत्रीला नवे
रहू दे असेच भाव निष्पाप अन निर्मलसे

दुराव्यत जपुयात
नाते आपले अपुलाकिचे
क्षण सारे सोयरे सुखाचे दुःखाचे मौनाचे

आणखी जवळ नको येवुयत
रहू दे अंतर पुसटसे
तरीही नसेल आपल्यात तुझे अन माझे

काहीच नको संगुयत
आपण आपल्या मनातले
समजुन घे सारे डोळ्यात माझ्या साठलेले

वेड़ी म्हन मला हवे तर
म्हण काय म्हणायचे ते
असेच जपयाचेत मला आयुष्यभर बंध आपल्या मैत्रीचे

मनोज वायचले