प्रेमात पडल्याशिवाय कळूच नाही शकत .....चारुदत्त अघोर.(६/५/११)

Started by charudutta_090, May 07, 2011, 12:05:05 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
प्रेमात पडल्याशिवाय कळूच नाही शकत  .....चारुदत्त अघोर.(६/५/११)
नाही कळणार कधीच,प्रेम हे काय असतं,
त्यात पडल्या शिवाय कसं कळेल,ते किती खोल असतं;
सागरा एवढं अथांग असतं,
कि किनारी रेती एवढं ओलं असतं;
अंबरा एवढं आच्छादित असतं,
कि त्यातल्या सूर्या बिंबा एवढं,भेदीत असतं,
दिवसा एवढं,कार्य-शुद्ध असतं,
कि रात्री एवढं,प्रणय-बद्ध असतं;
आकाशी चंद्रा एवढं, दुधाळ असतं,
कि कधी त्याला झाकतं,आभाळ असतं;
भोवतालच्या चांदण्यांन एवढं,शिंपित असतं,
कि मद मस्त रात राणीच्या फुलांनी,गुंफीत असतं;
प्रियकराच्या मोहक स्पर्श्यानं,प्रणयी थाट असतं,
कि उशीर करत असलेल्या,त्याची पाहती,चातकी वाट असतं;
तो आला कि त्याच्यावर रुसून,फुगणं असतं,
कि त्याचाकारिता स्वतः झालेलं,प्रेम-रुग्ण असतं;
तो न बोलला तर,आतल्या आत गुदमर्ण असतं,
कि त्याच्या चुकून झालेल्या स्पर्शानी,मोहरून अध्मर्ण असतं,
त्याला मनावायच्या ना ना तर्हांनी,रंगीत असतं,
कि त्यांनी दुखावलेल्या शब्दानं,मन भंगीत असतं;
त्याच्या छातीवर डोकं ठेवून,हुंद्कावणं असतं,
कि त्याच्या एका घेतल्या पप्पी ने,सुखावणं असतं;
त्याच्या एका प्रखर नजरेनं,घायाळणं असतं,
कि त्याच्या पान्घ्रुणीत उघड्या पाऊलांना,पायाळणं असतं;
त्याच्या मिठीत मुसळधार पावसी,छत्रावणं असतं,
कि धिटावल्या त्याच्या हिमतीला, कात्रावणं असतं;
दोन हाथी त्याला मानेत मांडावून,केशी कुरवाळणं असतं,
कि त्याच्या विशाल पिळदार पाठी डोकावून,हिरवळणं असतं;
त्याच्या पाशी,मिलनीत श्वासी,धुन्दावणं असतं,
कि त्याच्या पांघरूणी ढिलावून,रात्र मंदावणं असतं;
त्याच्या स्वाधीन स्वतःस,कुस्कर्ण असतं,
कि त्याच्या मिश्कील खोड्यांना,मस्कर्ण असतं;
त्याच्या पुरुषी अहंकाराला, जपणं असतं,
कि त्याच्या जोडीदारी करिता,तपणं असतं;
त्याचं तारुण्यीत ऐश्वर्य,फक्त भोगणं असतं,
कि त्याच्या करिता स्वतःस,आजन्म त्यागणं असतं;
काय कळणार प्रेम हे पातळ पाणी,कि दुधावरची साय असतं,
प्रेमात पडल्याशिवाय कळूच नाही शकत,कि प्रेम हे काय असतं...!
चारुदत्त अघोर.(६/५/११)