"कैरीचं पन्ह...." चारुदत्त अघोर.

Started by charudutta_090, May 10, 2011, 08:12:52 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"कैरीचं पन्ह...." चारुदत्त अघोर.(२६/४/११)
कधी कधी किती,त्याच गोष्टी घडतात..
पुन्हा तसंच वागणं,भाग पाडतात;
तुला आठवतं,तुझं आवडतं पेय कैरीचं पन्ह,
जणू तुझ्या प्रतिमेचं, तेच बोध चिन्ह;
जे तुला कैरी, उकळून आवडायचं,
आणि मला कैरी, किसून रुचायचं;;
या करिता आपले कायम,व्हायचे वाद,
ज्याला मी कधीच दिली नाही दाद;
पण तू कधीच माझ्या आवडीचं, किसून पन्ह केलं नाही,
मी हि तुझ्या आवडीचं उकळलं पन्ह,कधी घेतलं नाही;
मी नाही पीत म्हणून किती प्रचंड तू त्रागायची,
पटवून,कसं थंड ते असतं,घालून पदिना अन विलायची;
एकदा सहज मी म्हटलेलं, कि आज तुझ्या पद्धतीचं पन्ह कर,
त्या वेळी तुझ्या उसळलेला आनंद,ज्याला आजही नाही कुठलीच सर;
अति उत्साहाने तू कैर्या उकळून,थंड पाणी गरल्यात,
तुझ्या मुठी मळून त्या,कोई रेशी उरल्यात;
पूर्ण पदिना,वेलची घालून तू, मला ते हातानं पाजलं,
थंडावून हसत तूझं खोडसाळ चिडकं ध्यान,शांत निजलं;
नंतर तू तेच पन्ह स्वतः,विजयाने करती झाली चाखीत,
चव घेताच चेहेरा आक्रसून,झाली आश्चर्य चकित;
कारण,साखर सोडून सगळं साहित्य होतं,आठवणीने घातलं,
इतक्या शांतपणे मी कसं प्यायलो,म्हणून नवलायीने बघितलं;
याला कारण म्हणजे,मिळावी सावली जेव्हा असतात रखरखीत उन्हं,
तसंच,तुझ्या हाथी गोडावलं होतं, ते थंड गार आंबट पन्ह...!!!
चारुदत्त अघोर.(२६/४/११)