मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत..

Started by Rahul Kumbhar, May 11, 2011, 10:51:30 PM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar

विकी आणि प्रिया दोन्ही एकाच कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी.
कॉलेजात सोबतच जायचं, यायचंही सोबत हा त्यांचा जणू नित्यक्रमच झाला होता. तसे
ते दोघेही समजूतदार होते. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणं, आलेल्या अडचणी
सोडवणं एवढंच नव्हे तर आर्थिक सहकार्य देखील ते एकमेकांना करत असत. कोणालाही
अभ्यासात काही अडचणी आल्यात तर ते एका ठिकाणी बसून त्यावर चर्चा करत असत.
प्रियाला सगळ्या मित्रामध्ये सर्वांत आधी आठवण यायची ती विक‍ीची आणि विकीचा इतर
मित्रापेक्षा प्रियावरच अधिक विश्वास होता.

विकी व प्रियाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरूच असायचे. विकीवरही प्रियाच्या
आईवडीलांचा चांगलाच विश्वास बसला होता तर विकीच्या घरी त्याच्यापेक्षा
प्रियाचेच जास्त लाड केले जात होते. त्यामुळे दोघांचे एकमेकांसोबत एकाच गाडीवर
फिरणे, सोबत सिनेमा पाहणं नेहमीचेच झाले होते. दोघंही सिन्सियर असल्याने गेल्या
सात वर्षांपासून कुठलेही भांडण न होता त्यांची मैत्री कायम होती.

कॉलेजात विकी व प्रिया नेहमीच सोबत फिरत असल्याने त्याच्या गैरहजेरीत त्यांच्या
इतर मित्र-मैत्रिणींमध्ये त्यांच्याविषयी निरनिराळे तर्क-वितर्क लढवले जायचे.
प्रिया दिसली रे दिसली की, विकीचे मित्र तिला ‍चिडवायचे. मात्र, प्रियाला
कॉलेजातील वातावरण चांगलेच माहित असल्याने ती त्याकडे फारसे लक्ष देत नव्हती.
मात्र, विकीच्या मनात प्रियाविषयीच्या प्रेमाचे बी पेरले गेले होते. त्यात
मित्र त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवत होते.

मग काय विकी चांगलाच फॉर्ममध्ये आला होता. नेहमीपेक्षा प्रियाची तो जरा जास्त
काळजी घेत होता. विकीच्या मनात काय विचार सुरू आहेत, याचा थांगपत्ता प्रियाला
नव्हता. विकीच्या वागण्या बोलण्यात कमालीचा बदल झाला होता.

एकदा विकी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. त्या दरम्यान प्रियाला
पाहण्यासाठी मुलाकडचे आले होते व त्यांनी प्रिया पसंत असल्याचे सांगितले.
प्रियालाही तो मुलगा आवडला होता. पाहुणे गेल्यानंतर लागलीच प्रियाने विकीला
मोबाइल करून लग्न ठरल्याची बातमी त्याला सगळ्यात आधी त्याला सांगितली. प्रियाचे
लग्न ठरल्याचे ऐकून विकीच्या पायाखालची वाळूच सरकली. सात वर्षापासून प्रियाच्या
निस्सिम मैत्रीला विकी प्रेम समजून बसला होता.

मोबाईलवर तिच्याशी संवाद साधत असताना विकीची जीभ अडखळत होती. मोठ्या हिमतीने
त्याने प्रियाचे अभिनंदन केले. मात्र बाहेरगावाहून आल्यानंतर विकी प्रियाला
टाळू लागला. कॉलेजातह‍ी तो आता तिच्यासोबत न फिरता त्याच्या मित्रांमध्येच वेळ
घालवू लागला. मुकेश, मोहम्मद रफीची दुःखद गाणी ऐकायला लागला. एकांतात रहायला
लागला. प्रियाने आणि त्याच्या घरच्यांनीही त्याला खूप समजावले. पण काहीही उपयोग
झाला नाही.

प्रियासोबत घालवलेले 'मैत्री'चे क्षण विसरण्यासाठी विकीला सिगारेट ओढण्याची सवय
जडली. प्रिया रस्त्याने दिसली की, तिच्यासमोर सिनेस्टाइलमध्ये सिगारेट ओढून
मित्रांमध्ये दर्द भरे नगमे मोठमोठ्याने गायचा. त्याचे प्रियाला खूप वाईट
वाटायचे. जणू त्याचा 'देवदास' झाला होता.

मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विकीने आधीच प्रियाजवळ आपली
प्रेमभावना व्यक्त केली असती तर त्याच्या मनातील गैरसमज वेळतच दूर झाला असता.
सात वर्षांच्या मैत्रीची फुललेली वेल क्षणात गळून गेली नसती


-Author Unknown

rockinjoe46

"मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.."
Epic true.

gaurig


Pravin5000

मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विकीने आधीच प्रियाजवळ आपली
प्रेमभावना व्यक्त केली असती तर त्याच्या मनातील गैरसमज वेळतच दूर झाला असता.
सात वर्षांच्या मैत्रीची फुललेली वेल क्षणात गळून गेली नसती....

manoj vaichale

मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विकीने आधीच प्रियाजवळ आपली
प्रेमभावना व्यक्त केली असती तर त्याच्या मनातील गैरसमज वेळतच दूर झाला असता.
सात वर्षांच्या मैत्रीची फुललेली वेल क्षणात गळून गेली नसती

pomadon

नाणेफेक केल्यावर नाण्याची एकचं बाजू दिसते दुसरी सदैव लपलेली (झाकलेली) असते....