आज सगळं संपून गेलय, माझ्याच मनातून

Started by vinodvin42, May 23, 2011, 12:23:40 PM

Previous topic - Next topic

vinodvin42

आज सगळं संपून गेलय, माझ्याच मनातून
रडणही आता ऊतू जातयं, माझ्याच मनातून
शब्दही फुटले नव्हते, अजून अंकुरातून
तरीही वादळ घेऊन गेले, मला तुझ्या डोळ्यातून

शांतपणे वर जेव्हा, आकाशाकडे पाहिले
मातीपेक्षा त्याचे प्रेम, जास्त जवळचे वाटले
जीवन आता संपले आहे, बाकी सर्वासाठी
अश्रूही आता थांबत नाहीयेत, मला रडण्यासाठी


रात्रीची स्वप्नही मला, आता खरी वाटतात
आठवणी सगळ्या येऊन, मला भेटून जातात
साठवलेले सगळे काही, हळूच घेऊन जातात
विरघळून त्या डोळ्यावाटे, मला चकवून जातात

आता एकच शिल्लक राहीलेय, मनाच्या सांगाड्यात
आठवणींची हाडे राहीलेत, उरलेल्या या जीवनात
अजूनही त्या आठवणी, रोज मी उकरतो
कुठेतरी काही असेल, म्हणून रोज स्वप्न पाहतो

तरीसुध्धा मला रोज, रिकामीच यावे लागते
रोज मला रडण्यासाठी, आयुष्याशी भांडावे लागते
नेहमी माझ्या बाबतीत, असेच नेमके घडते
शेवटी मला स्वःताहून, मनाला सांगावे लागते

की

आज सगळं संपून गेलय, माझ्याच मनातून
रडणही आता ऊतू जातयं, माझ्याच मनातून

[ही कविता अर्धीच दिली आहे.......पुढचा भाग न देऊ शकल्याबद्द्ल sorry]

.......................... संदीप उभळकर