प्रयत्न तर कर

Started by शिवाजी सांगळे, April 10, 2025, 04:22:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

प्रयत्न तर कर

एकदा प्रयत्न तर कर...बघ चार शब्द मांडून
मोकळं होईल मन तुझं बघ चार शब्द सांगून

कोंडलेल्या भावनांनी खरं त्रास होतो मनाला
चर्चा कर कुणाशी तरी, बघ चार शब्द बोलून

पानगळ होते शरदऋतूत पाहतो आपण सारे
आठव ऋतू तो बोलता,बघ चार शब्द टाळून

होताच कधी अपमान अवहेलना विनाकारण
खुशाल द्यावेत तोंडावर बघ चार शब्द मारून

करूनही चूक कुणी मागता प्रामाणिक माफी
क्षमा करताना बोलावेत बघ चार शब्द हासून

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९