पावसा फक्त एवढंच कर

Started by kp.rohit, May 30, 2011, 04:22:30 PM

Previous topic - Next topic

kp.rohit




पावसा फक्त एवढंच कर
अर्धे भरले ढग...
तळहातावर रिते कर!!
चार चुकार थेंब
मी झटकून टाकेन.
काहीच घडले नाही
असे उमजून वागेन.

पावसा फक्त एवढंच कर
अवेळीच जा बरसून...
नकळत झोपेत असताना!!
कळलेच तर घेईन मी डोळे मिटून
पोचपावती म्हणून सांडेन.
काहीबाही पापणीतून.

पावसा फक्त एवढंच कर
निघून जा काहीच न कळवता...
तुझ्या स्थलांतराच्या वेदना आणि
वाट पाहण्याची सोंगे प्रसवताना
आता जीव काही
पूर्वी इतका उसवत नाही.

-रोहित कुलकर्णी


rchandu

पोचपावती म्हणून सांडेन.
काहीबाही पापणीतून.
hur-hur lavnari sundar kavita, abhinandan.


pyesaware

आता जीव काही
पूर्वी इतका उसवत नाही.


Khupach chan ahea kavita...

madhura