किती वेळा

Started by शिवाजी सांगळे, April 17, 2025, 08:43:11 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

किती वेळा

खिडकी वरील पडदा
किती वेळा ओढून घ्यायचा?
वारा एवढा खट्याळ
तो असा हट्ट नाही सोडायचा!

नेहमी पाहणे तीला
टाळत असतो मी पडद्याआडून,
पाहून ओढाताण ती
पडदा आपणहून  घेतो उघडून !

वारा आणि पडद्याची
काही तरी वेगळी चाल असावी!
त्यांनाही वाटत असावं
आम्हा दोघांची नजरबंदी व्हावी!

यश मिळो त्यांना, उगा
हो-नाही असं संमिश्रपणे वाटतयं,
काहीच सुचेना हो राव!
ह्रदय कशाला उगाच धडधडतयं?

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९