आयुष्य कुठे चुकल का ???

Started by neeta, June 09, 2011, 03:53:15 PM

Previous topic - Next topic

neeta

आयुष्य कुठे चुकल का ???

आयुष्याच्या चढा-ओढीत, कर्तव्यामागे धावावे लागते,
पोटाची खळगी भराला ,
पिल्लांना दूर सरावे लागत ,
दिवस भराच्या कष्टाने त्यांना सुखाचा घास भरवावा लागतो,

पिल्लांचे भविष्य डोळ्या समोर ठेऊन ,
स्वतः दुखं पेलाव लागत ,
आयुष्यःचा चढ-उतारात मग ,
स्वतःच फरफटत जाव लागत ,

होते थोडे दुखं, सोसावे थोडे कष्ट ,
पिलांच्या पंखासाठी सारे जग व्यस्त
पंख फुटलेली पिल्ले मग भुरकन उडून जातात
जाताना आयुष्याचे गणित समजून जातात ,

गणिताची आकडेमोड आपल्याला समजत नाही,
आयुष्य कुठे चुकले का ? हेच उमजत नाही ,
गणित सोडवता -सोडवता , आयुष्य हातून सुटते ,
आयुष्य सुटल्यावर , पिल्लांना गणित चुकल्याचे भान होते ...


{ निता }

gaurig

khupach chan.....
गणिताची आकडेमोड आपल्याला समजत नाही,
आयुष्य कुठे चुकले का ? हेच उमजत नाही ,
गणित सोडवता -सोडवता , आयुष्य हातून सुटते ,
आयुष्य सुटल्यावर , पिल्लांना गणित चुकल्याचे भान होते ...