माझी प्रिया..

Started by Vaibhavphatak12, June 10, 2011, 04:31:03 PM

Previous topic - Next topic

Vaibhavphatak12

                माझी प्रिया..

चंद्र उगवे पुनवेचा, सवाल एकच त्याच्या मनी..
माझ्या येण्याआधीच इथे, कुठून आली रोशनी....

त्या बिचारयास काय माहित, की माझी प्रिया ही मजसंगे..
तिच्या नुसत्या असण्यानेच, सारी दुनिया झगमगे....

ती बाहेर पडताक्षणी, निसर्गसुद्धा सुखावतो..
खुले प्रसन्नपणे इतका, जणू  हर्ष नभी न मावतो....

बघता क्षणी वेड लागेल, असे ती अशी ललना..
रंभा उर्वशी फिक्या पडती, करता तिच्याशी तुलना....

स्मितहास्य होता तिचे, इंद्रधनू ही अवतरते..
चक्षू मिटले असतानाही, लावण्य मनामध्ये भरते....

जीवनात माझ्या येउनी आज,  तिने नंदनवन हे फुलविले..
परीस करी फक्त लोह्याचेच, हिने आयुष्याचे सोने घडविले....

                                                      वैभव फाटक.....


माझ्या काही कविता खालील लिंक वर Upload  केल्या आहेत...
http://vaibhavphatak12.blogspot.com/


udaychandanshive