आता राहू दे दुरावा.......

Started by madhura, June 18, 2011, 09:18:18 PM

Previous topic - Next topic

madhura

आता राहू दे दुरावा
काही काळ सोबतीला
आता ओळख स्वतःची
शोधू दे ग एकट्याला

गुंतताना तुझ्यामध्ये
स्वत्व हरवले माझे
गेलो बदलून असा
विश्व बदलले माझे

ऋतू नेहमी सभोती
फक्त तुझेच राहिले
वेचताना तुझी फुले
माझे फुलणे राहिले

ग्रीष्म लादून घेतला
वसंताला शोधावया
पाहातो ग तुझ्याविना
येतसे का मोहराया

फांदी जुनी आहे तरी
हवा मोहर तिलाही
श्वास तुला द्यावयाला
श्वास हवा ना मलाही ?

भासू दे ग तुला माझी
थोडी उणीव नव्याने
आपलेसे आहे कुणी
ह्याची जाणीव नव्याने

थोडे दूर राहूनिया
आणू नजिक मनाला
जे जे अप्राप्य तयाचे
वाटे अप्रूप मनाला......................

By : Vinit Vartak