माझा आवडता ऋतू...

Started by nphargude, June 27, 2011, 09:24:33 AM

Previous topic - Next topic

nphargude

माझा आवडता ऋतू...
पाऊस हा माझा आवडता ऋतू आहे.  पाऊसाला भूगोलात पावसाळा किंवा मॉन्सून म्हणतात. मला भूगोल अजिबात आवडत नाही. त्यात सगळे ढगासारखे दिसते. पाऊस पडला की मातीचा मस्त वास येतो मी हळूच थोडी माती खातो. खाले म्हणजे माणूस जगतो. पाउस हा ढगामुळे पडतो असे आमचे सर सांगतात. पण मी आजी कडून ऐकले की पाउस देव पाडतो. मला माझ्या वर्गातल्या बंड्याला पाडायचे आहे तो खूप बदमाश आहे, म्हणून मी देवाला पावण्यासाठी प्राथर्ना करतो. पावसाळा आला की आम्ही दरवर्षी रेनकोट व बूट घ्यायला बाजारात जातो. तिथे वेगवेगळे प्रकारचे रेनकोट असतात पण पप्पा मला त्यांना आवडतो तोच रेनकोट घेऊन देतात. मी मग रडत घरी येतो. पाऊसात बेडूक डराव डराव असे ओरडतात. पाउस पडल्य्ने सगळीकडे हिरवे रान उगवते. मला हिरवा रंग खूप आवडतो. पण आमच्या शाळेची चड्डी खाकी आहे. मी मोठा झालो की हिरवी प्यांट घालणार आहे. हिरवे रान प्राणी खातात. पावसाळा आला की आम्ही भोलानाथला पण शोधतो व त्याच्याकडून शाळेची सुट्टी पडेल का विचारून घेतो. पण भोलानाथ फक्त मान हलवतो. माझी अलीकडे कॉम्पुटरमुळे खूप मान दुखते. पावसाळा आला की आम्ही गल्लीतल्या गटारीत छोट्या होड्या करून सोडतो. गटारीतले पाणी फक्त पावसाळ्यात स्वच्छ असते. पाणी आपल्याला गरजेचे आहे. पाणी नसले तर कोणीही जिवंत राहणार नाही. पाउस नसेल तर पाणी मिळणार नाही आणि पाणी नसेल तर आपण जिवंत राहणार नाही व प्राणी पण जिवंत राहणार नाहीत. आमचा मोती कुत्रा पावसात रस्त्यातील डबक्यात मस्त डुम्बतो. आम्ही दर पावसाळी सुट्टीत धबधबा बघायला जातो. उंचावरून पडणारा धबधबा बघून माझे मन आनंदाने नाचू लागते. मला नाचायला सुधा खूप आवडते. गल्लीतल्या गणेश उत्सवात ब्रेंक डान्स मध्ये मी दरवर्षी जिंकतो. आम्ही मित्र पावसाळ्यात फुटबाल पण खेळतो. चिखलात जाऊन एकमेकांना पाडतो देखील आणि घरी आल्यावर आई मात्र आम्हाला त्या टीवीवरील डाग  अच्छे है सारख काही म्हणत नाही उलट कार्ट्या कुठे उन्दाडायला गेला होतास असे म्हणत पाठीत दोन रपेट हाणते. मी मोठा झाल्यावर टीवी वाल्यांवर केस करणार आहे. पाउस आला की आम्ही खूप मज्जा करतो. म्हणून मला पावसाळा खूप खूप आवडतो. जिवंत असेपर्यंत पाउस पडत राहो अशीच माझी ईश्वरचरणी प्राथना करतो आणि माझा निबंध संपवितो.

rudra


gaurig



nihalhegde

#4
nice  :) :) ;) :D ;D ;D >:( :o :-\   

sylvieh309@gmail.com

changala nibandh lihila aahe. parikshet asa lihila hota ka?


Pravin dhande

khupch chan nibandh ahe sir ...........................superb


bhumika

 :)  ;D :( 8)

sad isiliye kyunki main aise nibandh nahi likh sakti