आभास

Started by अमोल कांबळे, July 05, 2011, 01:16:37 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

संद्याकाळ जवळ आली कि नेहमी असं वाटतं,

तुझ्या आठवणीचं काहूर मनात दाटत.

त्या वळणावर तू मला दिसशील, अन बोलशील,

मी आलेय, बस झालं असं तुझं वागणं

अन माझं तुझ्याकडे वेड्यासारखं बघणं,

आता मात्र डोळे दुखून जातात , पाय थकून जातात ,

तू येणाऱ्या रस्त्यावर कित्येक ओळखीचे  भेटून जातात ,

मी भानावर येतो, स्वतालाच  हसतो ,

तू तर माज्या पासून दूर आहेस ,

असो माझा येणारा जाणारा श्वास  आहेस ,

इतका गुंतलोय तुझ्यात,

प्रत्येक क्षण तुझां आभास आहे.
                                      मैत्रेय

mahesh4812