आजचा दिवस

Started by pratikchougule1, July 09, 2011, 05:17:58 PM

Previous topic - Next topic

pratikchougule1

धावत पळत ट्रेन आज मी पकडली...
अहो भाग्य बसायला विंडो सीट सापडली...
तेवढ्यात समोर आल्या एक म्हाताऱ्या आजी...
उभे राहून प्रवास करायला झालो मी राजी....
आजी झाल्या खुश मिळाल्यावर जागा...
आशीर्वाद दिला "खूप मोठा हो रे राजा"....
दादर पर्यंत काय आजीने सोडली नाही पाठ..
स्तुती प्रशंसा करून माझी पुरी लावली वाट...
बस बस आजी खूप झाली आता स्तुती...
तुमच्यात मी माझी आजी पाहिली होती....
-- प्रतीक (८.०६.२०११)

gaurig


amoul


PRASAD NADKARNI


Payal mankar