एका आजोबांच मनोगत...

Started by Tinkutinkle, July 12, 2011, 06:18:16 AM

Previous topic - Next topic

Tinkutinkle

.
एकुलता एक मुलगा आमचा
त्याच्यावर केले खुप प्रेम,
त्याचेही आमच्यावर
तेवढेच प्रेम होते,
पण बायकोपुढे त्याचे
काहीही चालणार नव्हते,
,
शेवटी वृध्दाश्रमात सोडले त्याने
भेटायला येण्याच्या अटीवर,
तो कधीतरी येईल एकदा
जगलो याच आशेवर,
,
नातु झाल्याचे कळले
तो वर्षाचा झाल्यावर,
हर्षमानसी झाला इतका
अचानक गेलो त्याच्या
बर्थडेपार्टीवर,
,
वाटले होते दिसेल
मुलाला आनंद झालेला,
पण तिथे गेल्यावर दिसला
त्याचा चेहरा ओशाळलेला,
,
कळून चुकले त्याच क्षणी
व्यर्थ गेली माया,
सुन म्हणाली माझ्या मुलावरती
पडता कामा नये,
या म्हाताऱ्‍यांची छाया,
,
अपमानित दुःखी
परतलो आश्रमावरती
पण इतके होऊनही
कमी होत नव्हती माया मुलावरची,
पण इतके होऊनही
कमी होत नव्हती माया मुलावरची.
.
-ट्विँकल देशपांडे.

gaurig


rudra

kavita khupach chan ahe pan tyamadhun kahi bodh gheta aala tar adhik uttam......