पहिला पाऊस

Started by ankush.sonavane, July 13, 2011, 12:50:52 PM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

निळ्या शुभ्र आकाशात काळे ढग जमु लागले
किलबिलणारे पक्षी घरट्याकडे परतू लागले.

इवल्याश्या डोळ्यात भितीचे काहूर दाटू लागले
क्षणातच पावसाचे थेंब अंगावरती पडू लागले.

बेदुंध वा-यापासून स्वत:चा पदर सावरत होती
मंद पावलात आता हळुवार गती येत होती.

आकशात विज लपंडाव खेळत होती
क्षणातच मनाला घाबरवून जात होती.

भिती वाटणा-या पावसाला हात आलिंगन देत होते
पावसाचा प्रत्येक थेंब अंगावर आनंदाने झेलत होते.
                               अंकुश सोनावणे

gaurig