जमेल का तुला माझ्याविना

Started by ankush.sonavane, July 13, 2011, 12:58:32 PM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला
जेंव्हा उघडे नसतील डोळे माझे हे जग पाहायला.

            तुझ्या आठवणीत मी एकदा तरी येईल का
        जिवनामध्ये तुझ्या महत्व माझे असेल का.
            ----जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला

थांबतील का पाऊले तुझी वाटेवरून चालताना
रखरखत्या उन्हामध्ये सावली कुठेच नसताना.
---- जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला

           येणार कशी  पालवी वाळलेल्या झाडांना
           थांबतील कसे अश्रू थांबवणारे कोणी नसताना.
         ----जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला

आठवणीत जेंव्हा अश्रू  लागतील डोळ्यातून तुझ्या वाहयला
पाऊस बनून यावे लागेल मला अश्रू  तुझे लपवायला.
---जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला
                                     अंकुश सोनावणे