अन तिचा फोन आला....................

Started by ankush.sonavane, July 15, 2011, 12:01:48 PM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

आठवणीच्या वादळामध्ये गुरफटलो असताना
डोळ्यातून अश्रू वाहत असतना. 
अन तिचा फोन आला....................

        उचलून कानाजवळ आवाज ऐकताना
     बंद होवून जातो hello  बोलताना.     
       अन तिचा फोन आला ..................

दुखवलेल्या मनाला कसेतरी सावरताना
अश्रू पुसत मग फोन लावताना.
अन तिचा फोन आला....................

        चमकून जाते विज शब्द तिचे ऐकताना
        कसं जगावे जिवन आयुष्यात ती नसताना.
        अन तिचा फोन आला..................................

स्वताच्या लग्नाची बातमी सांगत होती
रडू नका एवढे सांगायला विसरली नव्हती.
अन तिचा फोन आला....................

        प्रत्येक वर्षी त्यादिवशी वाटते फोन बंद करावा
       भिती वाटते येणारा फोन तिचा तर नसावा.
      अन तिचा फोन आला....................
                                            अंकुश सोनावणे