माझ्या संसाराची कहाणी

Started by ankush.sonavane, July 15, 2011, 12:05:48 PM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

सांगतो तुम्हाला माझ्या संसाराची कहाणी
ऐकून येयील मग तुमच्या डोळ्यात पाणी.

        सहानभूतीची आशा मला दाखवून गेला वारा
      क्षणातच भेटीला आल्या पावसाच्या धारा.

व्याकुलेल्या जिवाला म्हटले थोडा गारवा मिळेल
नदीमधले पाणी माझ्या  झोपडीत शिरलं.

      छोटेसे घरटे माझे पाण्याबरोबर वाहू लागले
    उध्वस्त होताना संसार  डोळे उघडेच राहिले.

सुखी माझ्या संसाराला दुष्ट लागली कोणाची
कशी काय कृपा झाली माझ्यावरती निसर्गाची.
                                                  अंकुश सोनावणे