संत सेना महाराज-2

Started by Atul Kaviraje, May 26, 2025, 09:58:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          "संत चरित्र"
                         ------------

          संत सेना महाराज-

सेनाजींच्या प्रत्येक गवळणीमध्ये वेगवेगळ्या चित्रमालिका तयार केल्या आहेत. गवळणांच्या मनाची अवस्था, त्यांचे वर्तन सेनामहाराजांनी अतिशय चित्रवेधकपणे वर्णिले आहे. गोपिका दही दूघ घेऊन मथुरेच्या बाजारास निघतात, त्यांची अडवलेली वाट, गोकुळातील कृष्णाच्या खोड्या, श्रीकृष्णाच्या भेटीसाठी व्याकूळ झालेली राधा, गायी चारणारा कृष्ण, सोबती असणारा गोपाळगड्यांचा मेळा, एखाद्या चलतधिवासारखे अत्यंत मनोवेधक वर्णन त्यांनी केले आहे.

 गोपाळाचा कालाही असाच अपूर्व आहे. सेनार्जीचा वासुदेवही असाच आगळावेगळा असून, अध्यात्मविचार सांगणारा आहे. लोकांना, समाजाला तो

प्रपंच निद्रेतून जागा होण्याचा उपदेश करतो. गवळण, भारूड याबरोबरच सेनाजींच्या अन्य रचना अंगाई गीत, आरती, काला, पाळणा हे सर्व त्यांच्या कल्पकतेची कवित्वाची साक्ष देतात.

संत सेनामहाराजांच्या अभंगातील वाङ्मयीन सौंदर्य

इसवी सन १३व्या १४ व्या शतकातील ज्ञानदेव-नामदेव यांच्या समकालीन संतांच्या कवितेला अपूर्व असे वैभव प्राप्त झाले होते. त्यांची काव्यनिर्मिती म्हणजे अमृताबरोबर पैजा जिंकू शकेल' इतके समृद्ध शब्दांचे मराठी भाषेला मोठे देणे होय. मूळात त्या काळातील संतांचे विषय वेगळेच. बहुजन समाजात जन्म झाल्याने संस्कृत भाषेचे ज्ञान अगम्य. केवळ भक्तीची उत्कटता लोककल्याणाची तळमळ, उपदेशातून समाजप्रबोधन, यासारख्या वेगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त असे मराठीत काव्य पहिल्यांदा जन्माला येत होते.

बहुतेक संत फारसे विद्याव्यासंगी नव्हते. त्यामुळे त्यांचे मक्तिकाव्य हे प्रयत्न पूर्वक, हेतुपुरस्सर करीत नव्हते. तर त्यांच्या भक्तीच्या उमाळ्यातून ईश्वरभावनेचा सहज आविष्कार होत असे. कोणताही 'संत' मी कवी आहे, असा कोठेही त्यांच्या अभंगरचनेत उल्लेख नाही. केवळ विठ्ठलाप्रती व्यक्त झालेला भक्तीचा आविष्कार पाहावयास मिळतो. त्यामुळे संत नामदेव समकालीन किंवा उत्तरकालीन संतांच्या कवितेत कोठेही शब्दांचे सौंदर्य हेतुपुरस्सर अलंकार आविष्कारापेक्षा भक्तिभावनेचे सौंदर्य अधिक तेजःपूंज खुललेले दिसते.

संत सेनाजींच्या चरित्रात चरित्रकारांनी सेनाजी बालवयात शाळेत जात होते, असा उल्लेख केला आहे. वाचन लेखनापेक्षा ते बालवयापासून बहुश्रुत होते. तत्कालीन समाजात न्हावी समाजातील मुलाला संस्कृत शिक्षण तर मिळालेले नसेलच; परंतु त्यांच्या अनेक अभंगरचनांमधून पुराणकथांचा, वेदांचा, दैवतकथांचा लोककथांचा नामनिर्देश झालेला दिसतो. अर्थात सेनाजी वडिलांच्या सोबत संस्कारक्षम वयात मठ-मंदिरात हरीचिंतन, कीर्तन, प्रवचन ऐकण्यास जात होते. त्याचा हा परिणाम असावा, असे वाटते. लहानवयात, संत-महंतांच्या समागमात, संगतीत एकरूप होत असावेत. ज्येष्ठ अभ्यासक विचारवंतांच्या सोबत चर्चा, संवाद होत असावेत. वेदकाळातील उपनिषदांविषयी, पुराणकथांचे पुष्कळसे श्रवण, मनन, चिंतन झालेले असावे. त्यामुळे सेनाजर्जींची कविता अनेक पुराणकथांच्या

प्रसंग, घटना व्यक्तिनामाने भरलेली, मारलेली दिसते. विठ्ठलभक्तीमध्ये 'नाम' किती समर्थशील, प्रभावी, परिणामकारक आहे. याविषयीची उदाहरणे देताना सेनाजींनी वेदांपेक्षा 'नाम" किती मोठे आहे. 'वाल्या

कोळी ब्रह्महत्यारी। नामे तारिला निर्धारी।', या अभंगातून नामाचे महत्त्व काय करू शकते याचे उदाहरण दिले आहे. सेनाजींनी एखाद्या गोष्टीचे विशेष महत्त्व विशद करण्यासाठी जे पौराणिक दाखले दिले आहेत, हे दाखले सेनाजी बहुश्रुत असल्याचे गमक आहे. रामायण

लिहिणारे वाल्मीकी ऋषी त्यांचे पूर्वायुष्यातील नाव 'वाल्याकोळी' पापी माणूस हा

त्याच्यावरील शिक्का, नामस्मरणाने त्याचा ऋषी झाला. हे नामस्मरणाचे महत्त्व ते सांगतात.

     "रामे अहिल्या उद्धरिली। रामे गणिका तारिली।

     म्हणा राम श्रीराम। भवसिंधु तारक नाम।॥

     रामे जटायु तारिले। रामे वानरा उद्धरिले ॥

     ऐसा अयोध्येचा राजा। सेना म्हणे बाप माझा ॥"

खाली दिलेला अभंग संत सेना महाराजांनी रचलेला आहे, ज्यात श्रीरामाच्या कार्याचे महात्म्य वर्णन केले आहे. हा अभंग केवळ भक्तिरसपूर्ण नाही, तर तो जीवनातील मूल्य, श्रद्धा, आणि भक्तिची परिणामकारकता सांगणारा आहे.

✨ मूळ अभंग ✨

रामे अहिल्या उद्धरिली। रामे गणिका तारिली॥

म्हणा राम श्रीराम। भवसिंधु तारक नाम॥

रामे जटायु तारिले। रामे वानरा उद्धरिले॥

अैसा अयोध्येचा राजा। सेना म्हणे बाप माझा॥

🌼 संपूर्ण भावार्थ (सखोल विवेचन) 🌼

--संकलन
--अतुल परब
--दिनांक-26.05.2025-सोमवार.
===========================================