प्रपोज

Started by अमोल कांबळे, July 17, 2011, 08:14:09 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

एकटीच मला ती दिसली होती
उनाड पावसात भिजली होती
मी हि भिजत होतो
ती बघेल म्हणून बघत होतो
तिने पहिले अन विचारले
कारण मला भिजण्याचं
मी हि विचारलं कारण तिचं
एकटी बाहेर पडण्याचं
असंच भिजावं वाटतंय
आभाळ फुटावं असं वाटतंय
मला म्हणाली, चल भिजूया
बघ, पावसाची सर आली
तिच्या बरोबर भिजण्याची
खरच इच्च्या झाली
तिचं अल्लड धावणं
पावसासारखं
मातीत खेळणाऱ्या
पोरानं सारखं
वाकलेल्या झाडाची फांदी
तिने हळूच धरली
शुभ्र मोगर्यांच्या फुलांनी ओंजळ
भरली
किती छान फुले आहेत या
झाडाला
मी चरकलो,
कशी येतील मोगऱ्याची फुले
कडू निम्बाला
तिला समजले हा प्रयत्न
माझाच होता
पुढच्याच क्षणी तीचा
हात माझ्या हातात होता
म्हणाली,
मनात होतं, मग एवढा उशीर का?
मला कधीच कळलंय अन  तू एवढा बधीर का?
वेड्या, खूप प्रेम आहे माझे तुझ्या  वर
अमोल , तुझ्या वेडेपणावर!
                                   मैत्रेय (अमोल कांबळे)





mahesh4812


अमोल कांबळे


prabuddhasagar


अमोल कांबळे

धन्य वाद प्रबुद्धासागर .. असंच कळवत जा, लिहिण्यास हुरूप येतो