गावात बोंब झाली

Started by शिवाजी सांगळे, May 28, 2025, 02:19:10 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

गावात बोंब झाली

एकदा तिची नि माझी ठरवून भेट झाली
झाली उगा चर्चा,अन् गावात बोंब झाली || ध्रु ||

हाटेलाच्या भजींचा वाऱ्यावर गंध सुटला
पोटात भूकेचा, तेव्हा आगडोंब उठलेला
आमंत्रण देण्याची, संधी मला मिळाली || १ ||

बोलणे फार नाही इशाऱ्यात सर्व झाले
नास्ता करून पुरता बिलही देवून झाले
नको कुणी ओळखीचे पाहिले भोवताली || २ ||

सायकलवर चुकून तीचे दप्तर ठेवलेले
शेजारच्या कुणीतरी आम्हाला पाहिलेले
गावगप्पा करायची संधी त्याने न सोडली || ३ ||

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९