मला तुझी आठवण येत नाही............

Started by ankush.sonavane, July 20, 2011, 12:18:59 PM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

         मला तुझी आठवण येत नाही......

आठवतच भूतकाळ मि भविष्यकाळ विसरून जातो
वर्तमानकाळात सुद्धा मि माझाच नसतो.
असे समजू नकोस मला तुझी आठवण येत नाही............

        सुकलेल्या पापण्या क्षणातच ओल्या होवू लागतात
        एका पाठोपाठ सगळ्या मुंग्या वारुळातून बाहेर येतात.
       असे समजू नकोस मला तुझी आठवण येत नाही............

व्यक्त करण्यापेक्षा भावना समजणे महत्वाच आहे
आठवणी काढण्यापेक्षा आठवणीत ठेवण गरजेच आहे
असे समजू नकोस मला तुझी आठवण येत नाही............

       वाटत असेल तुला विसरून गेलो असेल मी तुला
       कधी जमेल का तुला विसरणे माझ्या मनाला
       असे समजू नकोस मला तुझी आठवण येत नाही............       
                                                    अंकुश सोनावणे