तुझ्या दाराहून जाता!.

Started by अमोल कांबळे, July 24, 2011, 03:09:22 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

तुझ्या  दाराहून जाता!
वेड लागतं जीवाला , डोळे  भिरभिर  आता ,
कसा  सावरू  स्वताला ,
तुझ्या  दाराहून  जाता,
तुझी  माझी भेट  झाली,
अन  पहिल्या  प्रीतीची धुंद बरसात  झाली ,
तुझ्या  दाराहून  जाता ,
मी  रोज  थांबायचं ,
तू  खिडकीत  उभी मी  तुला  पाहायचं ,
तुझ्या  दाराहून  जाता ,
घरच्यांना  शंका  आली .
तू  दिसायची मला, खिडकीच बंद झाली
तुझ्या दाराहून जाता
आज  वेगळ  वाटलं,
मंडपात उभी तू रडत माझं काळीज  फाटलं
तुझ्या  दाराहुनी जाता
गलबला कानी आला ,
मी  दारात  अडलो जीव घामाघूम झाला ,
तुझ्या  दारात  उभा मी ,
तू  बोलत  नव्हती,
एकट्याला  सोडूनी,निघून  गेली  होती ,
तुझ्या  दारातच  आता माझं  मरण  ठरलं,
तुझ्या सवे  सये ग, जग  कायमचं  सोडलं .
                                                    मैत्रेय (अमोल कांबळे)