स्वप्नातल्या सखे गं.

Started by amoul, July 27, 2011, 06:16:09 PM

Previous topic - Next topic

amoul

हळुवार जाग यावी स्वप्नातुनी सखे गं,
या जगात स्वप्नांच्या मन माझे नवखे गं.

माझ्या खुळ्या स्वप्नांना तू ये आकारण्याला,
अधुऱ्या काही स्वप्नांना तू ये साकारण्याला,
तू ये असशील  तिथुनी, ये असशील तशी निघोनी,
थकल्यात पापण्या गं नुसत्या तुला स्मरोनी.
मन शोधते दिशांत तुलाच सारखे गं.

हा कैफ भावनांचा छळतो किती तऱ्हेने,
वाऱ्यात गुंजती गं नादनारी पैंजणे.
झंकार कंगणाचे देती ना मला दिलासा,
तुलाच पाहतो मी पाहताना आरसा.
मन हरवले  तुझ्यात झाले मलाच पारखे गं.

तू असशील अशी तशी की, असशील वेगळीच,
कुणी राजकुमारी असशील की कुणी स्वप्न परीच.
सध्या रुपाची राणी, हळव्या मनाची आणि,
ठेवशील बांधून मला केवळ तुझ्या भावनांनी.
ठेवीन ओंजळीत तुझ्या माझी सारी सुखे गं.

का कसला विरह आला भेट होण्याच आधी ?,
तळमळ अशी ना झाली पूर्वी कधी या आधी.
जेव्हा होईल भेट घेशील का मिठीत,
क्षमवशील का हि वादळे तुझ्या त्याच मिठीत.
शपथ तुला तू येना माझ्या स्वप्नातल्या सखे गं.

................अमोल