संत सेना महाराज-

Started by Atul Kaviraje, June 14, 2025, 10:03:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          "संत चरित्र"
                         ------------

          संत सेना महाराज-

ह० भ० प० बाबामहाराज सातारकर आपल्या आशीर्वादामध्ये म्हणतात, मनुष्य जन्माला कुठे आला ? त्यापेक्षा जन्माला येऊन तो काय करतो, याला महत्त्व । आहे. म्हणूनच श्रीसंत सेनामहाराज यांचे जीवनचरित्र व सार्थ अभंगगाथा सर्व थरातील लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. (संत सेनामहाराज अभंगगाथा, गुळवणे-शिंदे, पृ० क्र० ६)

संत सेनाजी महाराष्ट्रातील की महाराष्ट्राबाहेरील या संदर्भात अनेकांनी आपापली मते वरीलप्रमाणे मांडलेली आहेत. सेनाजी महाराष्ट्रीय होते. याला एकमेव कारण, म्हणजे त्यांची अभंगरचना, ती सुद्धा अस्सल मराठी संस्काराची आहे. मराठी प्रांतातील माय मराठीतील बोलीभाषेमध्ये रूढ असणारे अनेक वाक्प्रचार सेनांच्या कवितेत पहावयास मिळतात. अस्सल मराठीपण अभंगा- अभंगामधून दिसते. अमराठी भाषिकाला अशा स्वरूपाचे शब्द वापरता येणे कठीण असते.

सेनाजीही नामदेवांप्रमाणे, महाराष्ट्राबाहेर प्रवासाच्या निमित्ताने गेलेले असावेत. राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेशामध्ये जाऊन संबंधित भाषेशी संबंध त्यांचा आला असावा. त्यामुळे बोटावर मोजण्याइतक्या रचना आणि पदे त्यांनी रचलेली असावीत.

        जन्मकाळ-

भगवद्भक्त सेनाजींचा जन्म बुंदेलखंडात रेवा संस्थानची राजधानी बांधवगड येथे इसवी सन १२७८ साली झाला. (भगवद्भक्त सेनाजी चरित्र भ० कृ० मोरे) 'श्री क्षीरसैन बंशप्रकाश' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी मिती वैशाख वद्य १२ रविवार विक्रम संवत् १३५७ हा जन्मकाळ निश्चित केला आहे. संत सेनाजीचा काळ हा शके १२०० ते १२८० (इसवी सन १२७२ ते १३५८) असा असावा असे. पां० ना० कुलकर्णी (प्रस्तावना 'सेना म्हणे') यांचे स्पष्ट मत आहे. तसेच ते म्हणतात, "सेनाजी हे पूर्णाशाने मराठी संत असून त्यांचे वास्तव्य मुख्यतः महाराष्ट्रात होते. अशी माझी भूमिका आहे." (पृ० क्र० २ व ३) सेनाजींच्या वडिलांचे नाव देविदास व आईचे नाव प्रेमकुंवरबाई, याशिवाय अजून दोन नावाचा उल्लेख काही चरित्रकारांनी केलेला दिसतो.

जन्मस्थळाच्या संदर्भात अनेक मते आहेत. महाराष्ट्राबाहेर पंजाब प्रांत अमृतसर येथे (सोहलठटही) चौदाव्या शतकात जन्म झाला. 'श्रीसेन प्रकाश' या हस्तलिखित बाडामध्ये त्यांचा जन्म राजपुतान्यात झाला, असा उल्लेख आहे. 'कल्याण मासिक गोरखपुर यामध्ये १३ व्या शतकात बोधगड राज्यात सेनाजीचा जन्म झाला असा उल्लेख आहे

वरीलप्रमाणे आपआपल्या पद्धतीने संशोधक, अभ्यासक, लेखकांनी ग्रंथाच्या हस्तलिखितांच्या, संशोधनाच्या आधारे पंजाब, मध्यप्रदेश, गुजराथ, राजपुताना यासारख्या ठिकाणी जन्माची ठिकाणे सांगितली आहेत. संत सेना महाराजांच्या संदर्भामध्ये त्यांचे जन्म स्थळ व काळ या बाबतीत

कोठेही एकमत दिसत नाही, अनेकदा या बाबी एखाद्या धूसर कथेसारख्या व अस्पष्ट जाणवतांना दिसतात. परंतु त्याच्या जीवनचरित्र कथेच्या बाबतीत मात्र एकाच प्रसंगाभोवती संपूर्णतः सर्व जण गुंतलेले दिसतात. अर्थात या कथेला किती आधार आहे, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही, परंतु ही कथा अनेक जुन्या संस्कृत भक्तमालामधून, भक्तविजयकार (३४व्या अध्यायात) महिपतीबुवा ताहराबादकर, जीमेन प्रकश ओवीबद्ध राजपुतान्यातील हस्तलिखित, गोरखपूरचे कल्याण मासिक, ग्वाल्हेरचे रा० ब० चिंतामणराव वैद्य, यांनी लिहिलेले चरित्र. श्री सेना सागर ग्रंथ, भगवद्भक्त सेनाजी चरित्र – भ० कृ० मोरे, श्रीक्षेमराज. श्री ध्रुवदास लिखित-भक्त नामावली ग्रंथ, संत सेनामहाराज – अभंगगाथा, संपादक श्रीधर गुळवणे, शिंदे रामचंद्र, पुणे, श्री संत सेनामहाराज चरित्र व काव्य, अहिरराव सुमन (प्रबंधिका) यांसारख्या सर्व संदर्भ ग्रंथातून जी जीवन चरित्राची माहिती मिळते. त्या आधारावरून त्यांचे जीवनचरित्र खालीलप्रमाणे मांडलेले आहे.

१३ व्या शतकात रेवा संस्थानामधील वाघेला रजपूत वंशाचे राजे राज्य करीत होते. आज जो मध्यप्रदेश म्हणून ओळखला जाणारा प्रांत आहे. यामध्ये रेवा संस्थानचा समावेश होतो. या संस्थानात 'बांधवगड' नावाचा एक मजबूत बांधणीचा किल्ला आहे. तो कैमूरच्या डोंगरावर बांधला होता. आज तो पडक्या अवस्थेत आहे. हा किल्ला म्हणजे रेवा संस्थानची राजधानी, वाघेला वंशातील महाराजा रामराजा(रामसिंह) राज्य करीत होता.

या राजाच्या पदरी देविदास नावाचा एक न्हावी होता. तो राजाच्या सेवेत राहून केस-दाढी करणे, अंगमर्दन करणे यांसारखी कामे राजसेवा म्हणून करीत होता. तो ईश्वराची भक्ती करीत असे. तो स्वभावाने धार्मिक व सात्त्विक होता. राजांचे नित्यकर्म करताना, उरकताना राजांसमवेत धार्मिक विषयांवर त्यांची सखोल चर्चा होत असे. त्यामुळे राजाच्या मनात देविदासाविषयी अतिशय अभिमान होता. देविदास व त्याची पत्नी घरी आलेल्या प्रत्येक साधुसंतांचे आदरातिथ्य करीत असत.

स्वामी रामानंद हे देविदासाचे गुरू होते. स्वामींच्या आशीर्वादाने या दापत्याच्या पोटी इसवी सन १२७८ (इसवी सन १३०१) मध्ये सेनाज्जींचा जन्म झाला.

--संकलन
--अतुल परब
--दिनांक-14.06.2025-शनिवार.
===========================================