संत सेना महाराज-

Started by Atul Kaviraje, June 16, 2025, 09:25:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          "संत चरित्र"
                         ------------

          संत सेना महाराज-

सेनामहाराज बालपणापासूनच ईश्वरभक्तीमध्ये आकर्षित झालेले होते व साधुजनांची सेवा करण्यात रमलेले होते. शिवाय मिळालेला पैसा दीनदुबळ्यांना वाटून टाकण्यात ते सदैव तत्पर असत.

तसेच दमल्या भागलेल्या लोकांचे पाय चेपणे, गोरगरिबांची हजामत करणे, त्यांचे अंग रगडून चोळणे इत्यादी प्रकारची सेवा ते विनामोबदला करीत असत. या सारख्या सेवेचे संस्कार त्यांना वडिलांकडून मिळाले.

याशिवाय त्यांना चौफेर ज्ञानसाधना, चिंतन, बहुश्रुतपणा आल्याने त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची चमक लोकांना प्रभावित करत असे. तसेच निकटवर्तीयांना एक सोज्वळ, विनम्र म्हणून सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे आकर्षित होत असे.

          रामानंदांचा अनुग्रह-

सेनार्जींचे वडील देविदास स्वामी रामानंदाचे शिष्य होते. एकदा देविदास राजा रामसिंहाची सेवा करण्यासाठी राजवाड्याकडे निघाले होते. त्याच वेळी त्यांचे गुरू स्वामी रामानंद देविदासांचे घरी आले होते. अशा वेळी देविदासांनी आपला पूत्व सेनाजी यास गुरू रामानंदांचे आदरातिथ्य करण्याची सेवा सांगून दरबारी निधून गेले. "देविदास राजाची सेवा आटोपून घरी आले. तर स्वामीजी सेना समवेत धार्मिक विषयांवर चर्चा करताना दिसले. इतकेच नव्हे. तर त्यांची यथास्थित सेवा करून चर्चेला बसले होते. हा प्रसंग पाहून देविदासांनी रामानंदांस विनंती केली की, आपणा सेनास अनुग्रह द्यावा. या वेळी स्वामी रामानंदांनी अतिशय प्रसन्न

मनाने सेनाजींना अनुग्रह दिला" 'भगवद्भक्त सेनाजी' ग्रंथामध्ये भ० कृ० मोरे यांनी नमूद केले आहे. (पृ० क्र० १५, १६) ते पुढे म्हणतात, "रामानंद स्वामींचा उपदेश, 'ईश्वर मातापिता यांची सेवा करण्यामध्ये

साधुवृत्ती प्रतीत होते. नीटनेटका प्रपंच करून इतरांचे अकल्याण न चिंतिता

न्यायनीतीस अनुसरून वागणे, यात जीवाचे रहस्य आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम यातील कर्तव्य पार पाडण्यातही ईश्वरी सेवेचा मोबदला हाती लागतो. अशी त्यांची श्रद्धा होती." (पृ० क्र० १७) जानदेव त्यांची भावंडे, त्यांचे वडील विठ्ठलपंत हे स्वामी रामानंदांचे शिष्य होते. म्हणून विठ्ठलपंत हे सेनाजींचे गुरुबंधू होते. भ० कृ० मोरे भगवद्भक्त सेनाजी चरित्रामध्ये म्हणतात, "काशी हे रामानंदांचे प्रचारकार्याचे ठिकाण, रामदत्त हे त्यांचे मूळ नाव, सुशीला ही त्याची माता. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी सर्व

शास्त्राध्यायन केले. राघवानंद हे रामानंदांचे गुरू. रामानंद हे अल्पायुषी होते. पण

गुरुप्रसादाने समाधी लावून त्यांनी मृत्यूपासून स्वतःची सुटका करून घेतली. इसवी सन १३०० ते १४११ त्यांचा चरित्रकाळ. खाणे-पिणे, जाती-पाती या नियमांना महत्त्व न देता, यांच्या संप्रदायामध्ये केवळ रामभक्तीला महत्त्व असे. गोपाळकृष्ण उपासनेऐवजी रामसीता उपासना ही यांच्या संप्रदायाची मुख्य ओळख

--संकलन
--अतुल परब
--दिनांक-16.06.2025-सोमवार.
===========================================